जामनेरात मोटार सायकली चोरणारे दोघे जेरबंद

4aff1034 3664 40ae 814b 196d49b245d6

जामनेर (प्रतिनिधी) येथील पोलिसांनी केले मोटार सायकली चोरणाऱ्या दोघांना जेरबंद केले आहे. रविवारी (दि.१६) शहरात पोलिसांनी गुन्हेगार शोध मोहीम राबवीत असतांना, पाचोरा रोड भागात हे दोघे संशयास्पद हालचाली करताना आढळून आले, म्हणुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दोन मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्रकाश रमेश वाघेला (वय २४) रा.करण चौफुली,शहादा रोड, नंदुरबार, मुळ रा. बुटाज, ता, भायवीर जि अहमदाबाद, (गुजरात) व राजु मनजीराम वाघेला (वय ३९) रा. दौलतनगर जळगाव, मुळ रा. सितापुर ता.वडवन जि.सुरेंद्रनगर,(गुजरात) अशी त्यांची नवे असून त्यांनी शहरातील शहरात बोहरा मंगल कार्यालयातून लग्नासाठी आलेल्या व-हाडींच्या दोन मोटार सायकली चोरल्याचे कबुल केले आहे. याबाबत येथील पोलीस स्टेशनला भा.द.वी. ३७९ मधील चोरीस गेलेली हिरो होन्डा कंपनीची काळ्या रंगाची सी.डी-१०० (क्रमांक एम.एफ.यु. ६७९७) व लाल रंगाची बजाज प्लॉटीना  (क्रमांक एम.एच.१९, बी.ए. ३७०४) अश्या दोन मोटार सायकली त्यांच्याकडुन हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस उप निरीक्षक विकास पाटील, स.फौ. जयसिंग राठोड, स.फौ. सुभाष माळी, हे.कॉ. दिलीप वाघमोडे, हे.काँ. रमेश कुमावत, पो.ना. योगेश महाजन, पो.कॉ. अमोल घुगे, निलेश घुगे, सोनसिंग ढोबाळ, प्रदीप पोळ यांनी केली. या दोघांकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस त्या दृष्टीने अधिक तपास करीत आहेत.

Protected Content