नांदेड,प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षक विध्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन शालेय पुस्तकांचे वाटप करीत आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाच्या निर्देशानुसार शाळेची घंटा यावर्षी वाजलीच नाही. विद्यार्थ्यांना शाळेत न येत घरीच अभ्यास करावयाचा असल्याने शासकीय माध्यमिक आश्रमाचे शिक्षक डी. बी. बोरसे व कर्मचारी के. आर. पाटील हे साळवा येथील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे घरोघरी जाऊन वाटप करीत आहे. आश्रमशाळेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.