घरून पळून आलेली महिला टी.सी स्टॉफच्या सतर्कतेने लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन

 

भुसावळ, प्रतिनिधी । उत्तर प्रदेश मधील भदोली गावातील महिला सुरतमध्ये आपल्या पती व मुलांसोबत राहत असून कुणालाही न सांगता ट्रेनने दुपारी भुसावळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली. तीला टीसी स्टॉफने तिकीट विचारले असता तिकीट नसल्याने महिलेस टिसी लॉबी मध्ये बसविले. महिलेस विचारणा केली असता ती पळून आल्याची सत्यता समोर आली. टी.सी स्टॉफ सतर्कतेमुळे महिला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.

सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेशातील भदोली जिल्ह्यातील खुशबु योगेश सिंग (वय 20 ह.मु.कैलास चौकी,ईश्वर नगर,सुरत) मध्ये राहत असून पती सोबत भाडंण करून कुणालाही न सांगता रागाच्या भरात घरून निघून ट्रेनने भुसावळ रेल्वे स्थानकावर आली. प्लॅटफॉर्म वर उतरली असता टीसी स्टॉफने तिकीट विचारणा केली असता तिकीट नसल्याने महिलेस टिसी लॉबीमध्ये बसविले. महिला टीसी यांनी महिलेची विचारणा केली असता ती महिला घरून पळून आल्याची सत्यता समोर आली. याबाबत टीसी स्टॉफने एस.सी.एम.ए.के.पाठक यांना सविस्तर माहिती दिली असता यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात मेमो देण्यास सांगितले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली टीसी स्टॉफ ने मेमो तयार करून रेल्वे सुरक्षा बलच्या सब इनस्पेक्टर दीपा सिंग यांनी भेट घेतली असता त्यांनी मेमो घेण्यास नकार दिला व तुमच्याकडून जे होईल ते करा मी मेमो घेणार नाही असे उर्मट भाषेत धिक्कार दिला. या बाबत एस.सी.एम.ए.के.पाठक यांना कळविले असता त्यांनी कंट्रोल यांना सूचना देऊन सर्व माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच टीसी स्टॉफला लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या नावाने मेमो बनविण्याचे आदेश दिले. त्यानुसार टीसी स्टॉफ लॉबीचे इंचार्ज शेख गोठले, नवनीत तिवारी, दीपाली बोबडे, मोहम्मद अकिल, एम. डी. फिरके, आयटीसीएओ सचिव निसार खान अशांनी रेल्वे सुरक्षा बलच्या दीपा सिंग व दोन कर्मचारी सोबत घेऊन महिलेस लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले.

कोर्टासमोर आर.पी.एफ.स्टॉफचा टीसी विरुद्ध पलटवार…

रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी कोर्टासमोर पलटवार करीत टीसी आम्हाला कुठलीही माहिती देत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यानुसार आजरोजी महिला पळून आल्याची माहिती कळविली असता रेल्वे सुरक्षा बलच्या सब इनस्पेक्टर दीपा सिंग यांना मेमो दिला असता त्यांनी घेण्यास टाळाटाळ केली. हे तर चोरांच्या उलट्या बोबा असा प्रकार दिसत आहे. एकीकडे टीसी आम्हाला माहिती देत नाही असे रेल्वे सुरक्षा बल गोंगाटा घालत आहे. तर दुसरीकडे मेमो घेण्यास नकार देत आहे असे अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी चर्चा टीसी स्टॉफ मध्ये दबक्या आवाजात सुरू होती.

लोहमार्ग पोलीस निरीक्षकांच्या मदतीने परिवाराशी झाला संपर्क…   
कुठलीही माहिती परिवाराला न सांगता खुशबू सिंग ही महिला सुरत वरून घरातून पती सोबत भाडंण करून पळून आलेली शेवटी भुसावळ टीसी स्टॉफच्या सतर्कतेमुळे सुरक्षितेत टीसी स्टॉफ लॉबीने मिळून लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांच्या स्वाधीन केले. निरीक्षकांनी सुरतला महिलेच्या परिवारास संपर्क साधला असता महिलेचे पती लवकरच भुसावळ स्टेशन गाठून महिलेस ताब्यात घेणार असल्याची माहिती टीसी स्टॉफने दिली.

Protected Content