गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र स्थापन करणेसाठी जिल्ह्यातील जळगाव व यावल तालुका वगळता इतर १३ तालुक्यात गोवंश सेवा संस्थांकडून विहित नमुन्यातील अर्ज १९ जुलै, २०२३ पर्यंत जिल्ह्यातील तालुका स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेमार्फत आवश्यक व परिपूर्ण कागदपत्रांसह मागविण्यात येत आहे.

 

अधिक माहितीसाठी व अर्जाचा विहित नमुन्यासाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती  यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content