जळगाव : प्रतिनिधी । शहरातील कोल्हे हिल्स येथील विवाहितेने दरमहा घराचा हप्ता भरण्यासाठी वीस हजार रुपये आणावे यासाठी पतीसह सासरच्यांनी विवाहितेवर सुरीने वार करून जखमी केल्याची घटना घडली विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
प्रियंका यांचा २०१९ मध्ये वाघनगर परिसरातील कोल्हे हिल्स येथील सागर इंगळे यांच्यासोबत विवाह झाला. विवाहानंतर सुरुवातीचे सहा महिने व्यवस्थित पार पडले. नंतर पतीसह सासरच्यांनी घराचा हप्ता भरण्यासाठी दरमहा वीस हजार रुपये आणावे यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. यातूनच विवाहिता ४ एप्रिलरोजी तिच्या हातावर पाठीवर सुरीने वार केले. सासरच्यांकडून होत असलेला छळ असह्य झाल्याने अखेर प्रियंका इंगळे यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून सागर इंगळे , प्रमोद इंगळे, विमलबाई इंगळे, पूजा वाघ, प्रमोद वाघ (सर्व रा वाघनगर ) यांच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हे कॉ सतीश हाळनोर करीत आहेत.