घरफोडी व चोरीच्या उद्देशाने दुचाकीवरून फिरणाऱ्या तिघे ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील सिंधी कॉलनीजवळील कुंवरनगरात घरफोडी व चोरीच्या उद्देशाने दुचाकीवरून फिरणाऱ्या तीन संशयितांना एमआयडीसी पोलीसांनी पाठलाग करून पकडले आहे. त्यांच्याकडील दुचाकी हस्तगत करण्यात आली असून शनिवारी २५ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनीजवळील कुंवरनगरात शनिवारी २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता नाकाबांदी करून वाहनांची चौकशी करत असतांना तीन जण दुचाकीने चोरी व घरफोडी करण्याच्या उद्देशाने संशयास्पद हालचाली करत  असल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोहेकॉ अशोक पवार, पो.ना. सुधिर साळवे, श्रीकांत बदर, होमगार्ड रविंद्र पाटील यांनी तिघांना पाठलाग करून पकडले. चौकशीत रवि प्रकाश चव्हाण (वय-१९) रा. तांबापूरा, जळगाव आणि साईनगरात दोन अल्पवयीन मुले असे तिघांचे नावे निष्पन्न झाली. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार तिघांना ताब्यात घेत दुचाकी हस्तगत केली आहे. याप्रकरणी शनिवारी २५ मार्च रोजी रात्री उशीरा पोलीस नाईक श्रीकांत बदर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यता आला आहे.

Protected Content