Home क्राईम घरकुलचा निकाल पुन्हा लांबणीवर ; आता २७ जूनला घोषित होणार निकाल

घरकुलचा निकाल पुन्हा लांबणीवर ; आता २७ जूनला घोषित होणार निकाल


333979 jaindeokare 300x169

धुळे (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जळगाव घरकुल गैरव्यवहाराचा आज निकाल जाहीर होणार होता. परंतु आता याप्रकरणाची पुढील सुनावणी २७ जून रोजी होणार आहे. दरम्यान, या घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा संशयितांमध्ये समावेश आहे. त्यामुळे निकाल काय लागतो? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

 

या संदर्भात अधिक असे की,जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात ४५ कोटी रुपयांचा अपहाराबाबत धुळे जिल्हा कोर्टात निकाल याआधी २१ मे रोजी घोषित होणार होता. परंतु काही संशयित आरोपी गैरहजर असल्यामुळे न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जूनला ठेवली होती. परंतू कोर्ट सुटीवर असल्यामुळे आज देखील निकाल घोषित करण्यात आला नाही. कोर्ट २२ जून रोजी परत येणार असल्याचे कळते. त्यामुळे घरकुल निकालाची पुढील तारीख आता २७ जून आहे. घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा संशयितांमध्ये समावेश आहे. दरम्यान, या घोटाळ्यात दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा संशयितांना झाल्यास त्यांना निवडणूक लढता येणार नाहीय. त्यामुळे हा निकाल माजी मंत्री सुरेशदादा जैन व गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा राजकीय जीवनावर परिणाम करणारा असणार आहे. दुसरीकडे आज सर्व संशयित आरोपी आज कोर्टात हजर होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound