जळगाव, लाइव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात महाराष्ट्र सहकारी संस्था अंतर्गत ग.स.सोसायटी च्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास निवडणूक उमेद्वारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर भाऊगर्दी केल्याचे दिसून आले.
ग.स.सोसायटी निवडणुकीसाठी २५ मार्च पासून निवडणूक अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी मुदतीअंती दिग्गज उमेदवारांनी ग.स.सोसायटीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहातील निवडणूक कार्यालयात आज गुरुवारी अर्ज दाखल केले आहेत.
जिल्ह्यातून लोकमान्य, सहकार, प्रगती, लोकसहकार, आणि स्वराज्य अशा ५ गटातून निवडणूक लढवली जात असून आज उमेदवारी अर्ज दाखल
करण्यासाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गुरुवारी मुदत संपण्यापूर्वी विलास नेरकर, सुनील निंबा पाटील, सुनील अमृत पाटील, सुनील
सूर्यवंशी, गणेश भास्कर पाटील, रवींद्र पाटील, प्रतिभा सुर्वे, उदय पाटील, शैलेश राणे, मगन पाटील, अजबसिंग पाटील, कल्पना पाटील, किशोर पाटील आदी
उमेदवारापैकी बहुतांश उमेदवारांनी धावपळ करीत मुदतीच्या आत नामांकन अर्ज अर्ज दाखल केले.