यावल, प्रतिनिधी । यावक तालुक्यातील विरावली येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अॅड देवकांत बाजीराव पाटील यांची ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अॅड देवकांत पाटील यांना राज्य सचिवपदाचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वंदना जैन यांनी नुकतेच दिले आहे. अॅड. पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व विरावली ग्रामपंचायत सदस्य आहेत. देवकांत पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांची महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या कार्यकारिणीत सचिवपदी निवड झाली आहे. निवडीबद्दल पाटील यांनी आभार मानले असून आपण या पदाला न्याय देऊ असे त्यांनी सांगितले. निवडीबद्दल अॅड. देवकांत पाटील यांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड रवींद्र पाटील , आमदार शिरिष चौधरी , माजी पालकमंत्री डॉ सतीष आण्णा पाटील , माजी आमदार मनीष जैन , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुकेश येवले, माजी नगर अध्यक्ष शशांक देशपांडे , माजी नगराध्यक्ष अतुल पाटील ,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष तथा जि प चे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे , पंचायत समितीचे गट नेते शेखर पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण आरोग्य तथा क्रीडा सभापती रवींद्र पाटील , माजी उपसभापती पं.स.दीपक पाटील , सेनेचे उपजिल्हासंपर्क प्रमुख भूषण नागरे , मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष अजय पाटील , फैजपूर चे शहर अध्यक्ष अन्वर खाटीक , समन्वयक किशोर माळी, यावल वकील बार संघ अध्यक्ष यावल बार अँड धीरज चौधरी , सचिव निलेश मोरे अँड के डी पाटील , अँड नितीन चौधरी , यांच्यासह तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आह .