धरणगाव ग्रामीण रूग्णालयास पालकमंत्र्यांकडून विशेष निधी; नगराध्यक्षांच्या पाठपुराव्याला यश

धरणगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगाव, रावेर आणि चोपडा ग्रामीण रूग्णालयाला १ कोटी ११ लाख रूपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. धरणगाचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी ग्रामीण रूग्णालयाला निधी मिळावा अशी मागणी पालकमंत्री ना. पाटील यांच्याकडे केली होती. नगराध्यक्ष चौधरी यांनी वेळोवेळी पाठपूराव्याच्या विनंतीला मान देऊन पालकमंत्र्यांनी धरणगाव ग्रामीण रूग्णालयासाठी ७० लाखांचा निधी मंजूर केला आहे.

सध्या राज्यासह देशात कोरोना विषाणूची प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत ग्रामीण रूग्णालयात सर्व सुविधा व सामुग्री उपलब्ध व्हावी यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केली होती. तसा प्रस्ताव पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. धरणगाव ग्रामीण रूग्णालयाला निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी पाठपुरावा केला. पालकमंत्री ना. पाटील यांच्या सुचनेनुसार धरणगाव, चोपडा आणि रावेर ग्रामीण रूग्णालयात साहित्य सामुग्रीसाठी १ कोटी ११ लाख रूपयांची निधीस जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

धरणगाव रूग्णालयासाठी ७० लाखाचा निधी
धरणगाव रूग्णालयातसाठी डिजीटल एक्स-रे मशीन, हिमोग्लोबी मीटर, ओटी टेबल, ओटी लाईट व ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर, एन ९५ मास्क, सॅनिटाझर, पी.पी.ई. कीट, इन्फ्रारेड थर्मोमीटर, ट्रिपल लेयर मास्क, हॅन्डग्लोज, जम्बो ऑक्सिजन सिलेंडर, डिजीटल मॅमोग्राफी मशीन या साहित्यासाठी ७० लाखाचा निधी मंजूर केला आहे.

Protected Content