ग्रामीण रूग्णालयातून कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविली

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयातून कर्मचाऱ्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवार १३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, योगेश चैत्राम पाटील (वय-२६) रा. धरणगाव हा तरुण धरणगाव ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नोकरीला आहे. कामावर येण्या जाण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १५ सीपी ९९७२) क्रमांकाची दुचकी आहे. १२ डिसेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ९.१५ वाजता योगेश पाटील हा कामावर हजर झाला. त्यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील पार्किंग झोनमध्ये त्याची दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान दुपारी २ महिन्याच्या सुमारास जेवणासाठी घरी जाण्यास निघाले असता त्यांना जागेवर दुचाकी मिळून आले नाही. त्यांनी सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला परंतु मिळून आली नाही. मंगळवार १३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा करीत आहे.

Protected Content