जळगाव प्रतिनिधी । स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य शासनाने तात्काळी कार्यवाही करावी यासह विविध मागण्यांसाठी गोर सेनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शुक्रवार २० ऑगस्ट रेाजी एक दिवसीय उपोषण करण्यात आले असून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी शासनाने तात्काळ कारवाई करावी, मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संयुक्त पुर्व परिक्षेचे सर्व परिक्षचे वेळापत्रक जाहीर करावे, बार्टीच्या धरतीवर सारथीप्रमाणे महाज्योतीला तीन हजार कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावे , वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना चालु निवृत्त पेन्शन योजना लागू करावी,युजीसी निदेशानुसार संवर्ग आरक्षण कायदा लागू करून महाविद्यल आणि विद्यापीठ प्राध्यापकांची भरती सुरू करावी या सर्व मागण्यांसाठी आज शुक्रवार २० ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. व विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
याप्रसंगी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, सुभाष जाधव, जळगाव जिल्हाध्यक्ष माधव राठोड, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड, जिल्हा संयोजक पंडीत चव्हाण, सचिव चेतन जाधव, सहसचिव नंदू चव्हाण, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख अभिजित चव्हाण, शहराध्यक्ष सुनिल चव्हाण, शहर उपाध्यक्ष रामेश्वर चव्हाण, बालचंद चव्हाण, सुरेश राठोड, विशाल चव्हाण, अनिल राठोड, राहूल पवार, राहूल जाधव, किशोर चव्हाण यांच्यासह गोर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/1714809278713471