जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील फातेमा नगरात प्लॉस्टीक कंपनीच्या बाजूला असलेल्या पत्राच्या शेडमध्ये गोमांस विक्री करणाऱ्या संशयितावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून गोमांस व साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांना मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील असलेल्या फातेमा नगरातील प्लास्टिक कंपनीच्याजवळ असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये गोमांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक हेमंत कळस्कर, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, वाहन चालक रवींद्र चौधरी, राहुल रगडे आणि विजय कोळी यांनी गुरूवारी १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता धडक कारवाई करत संशयित आरोपी मुख्तार जमाल शेख (वय-३२) रा. फातिमानगर मन्यारखेडा शिवार जळगाव याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून गोमांस, हाडे, सुरा आणि कुऱ्हाड जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल चंद्रकांत रगडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मुक्तार जमाल शेख (वय-३२) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.