गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतर्गत धनादेश वाटप

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या  वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये प्रमाणे एकूण १२ लाखाचे धनादेश  तसेच पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना धनादेश व प्रमाणपत्र  पालकमंत्री गुलाबराव पाटील  यांच्या हस्ते रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात वाटप करण्यात आले.

 

शेती व्यवसाय करताना होणारे अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वकाराव लागत. अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक लाभ देण्यात येतो.  जेणेकरून अश्या गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल  या योजनेअंतर्गत जळगाव तालुक्यातील सन २०२२-२३  मध्ये खंडित कालावधीतील एकूण ६ प्रकरणे मंजूर करण्यात आले असून संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या  वारसांना यात  रंजना पाटील (कडगाव),  कविता धनगर (नंदगाव), चंद्रकला कोळी (विदगाव), सरला काटे (सुजदे),  तिलोत्तमा अत्तरदे (भादली खु.), रुक्‍माबाई कुंभार (तरसोद) या  वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये प्रमाणे एकूण १२ लाखाचे धनादेश  पालकमंत्री गुलाबराव पाटील  यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच भौगोलिक मानांकन स्थानिक वाणाची ओळख अंतर्गत जळगाव तालुक्यातील ३७६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांनाही  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

जिल्हा व तालुका स्तरीय पिक स्पर्धेतील विजेते

 

कृषी विभागाने सन २०२१-२२ या वर्षात पिक स्पर्धेचे आयोजन केले होते. यात जिल्हास्तरावर ३०  व तालुका स्तरावर ३० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.त्यातून जिल्हा स्तरावर प्रथम – विनोद पाटील नशिराबाद २० हजार, द्वितीय- आधार चौधरी आव्हाणे १० हजार, तृतीय – ज्ञानेश्वर चौधरी आव्हाणे, ७ हजार तर जळगाव तालुकास्तर प्रथम- राजेंद्र पाटील गाढोदा५ हजार, द्वितीय -डीगंबर चौधरी  ३ हजार, व तृतीय – राजेश वाडेकर बिलखेडा २  हजार याप्रमाणे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात येऊन या शेतकऱ्यांचा गुण-गौरव करण्यात आला.

 

याप्रसंगी नगरसेवक मनोज चौधरी, आत्मा कमिटीचे पी के. पाटील, तालुका कृषी अधिकारी एस जे राऊत, मंडळ अधिकारी एम. के. वालदे, एम. जी. जंगले, बाळू अहिरे, नानासाहेब सूर्यवंशी, जितू नारखेडे, भूषण पाटील, गजानन पाटील, संजय पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक सचिन बाविस्कर यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी एस. जे. राऊत यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेबाबत सविस्तर माहिती विशद करून जिल्ह्या व तालुकास्तरीय पिक स्पर्धेची माहिती दिली. आभार आत्मा कमिटीचे अध्यक्ष पी. के. पाटील यांनी मानले.

Protected Content