बालिकेचे अपहरण करणाऱ्यास कुटूंबियांनीच पकडले रंगेहाथ

जळगाव– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील एमआयडीसी जे सेक्टरमधील ४ वर्षीय बालिकेचे अपहरण करणाऱ्या संशयिता बालिकेच्या कुटुंबियांनीच रंगेहाथ पकडल्याची घटना रविवार, दि. २१ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

राजेश राजपाल अखंडे वय २२ रा. दहीयत परेठा, ता. खकनार, जि. खंडवा, मध्यप्रदेश असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

एमआयडीसीतील जे सेक्टर येथील टेक्नोफेब नावाच्या कंपनीसमोर मजूर त्याच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. रविवारी याठिकाणाहून राजेश अखंडे हा  ४ वर्षीय मुलीला उचलून पळवून घेवून जाण्याचा प्रयत्नात होता; मात्र वेळीच हा प्रकार मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी राजेश अखंडे या रंगेहाथ पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणी मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरुन राजेश अखंडे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक निलेश गोसावी हे करीत आहेत.

Protected Content