पवार कुटुंबात काय सुरू आहे ? : राऊत यांनी केला ‘हा’ दावा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे अजित पवार यांच्या भूमिकेबाबत संशयकल्लोळ निर्माण झालेला असतांना संजय राऊत यांनी शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्या भेटीबाबत आपल्या लेखात गौप्यस्फोट करतांना अनेक बाबींचा उल्लेख केला आहे.

 

अलीकडेच काही दिवसांपूर्वी शिवसेना-उबाठा पक्षाचे नेते उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. याप्रसंगी संजय राऊत यांची देखील उपस्थिती होती. या भेटीचा तपशील समोर आला नसला तरी आज दैनिक सामनातील आपल्या रोखठोक या स्तंभातून संजय राऊत यांनी अनेक बाबींना सूचकपणे नमूद केले आहे.

 

खासदार संजय राऊत यांच्या मते शरद पवार यांनी या भेटीत उध्दव ठाकरे यांना आपल्या कुटुंबावर मोठा दबाव असल्याचे मान्य केले आहे. अर्थात, कितीही दबाव आला तरी आपण भाजप सोबत जाणार नसल्याची ग्वाही देखील त्यांनी या भेटीमध्ये दिलेली असल्याचे खासदार राऊत म्हणाले. या बैठकीत राज्यातील विद्यमान स्थितीवरही मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे राऊत यांनी नमूद केले आहे.

Protected Content