गोपीनाथराव मुंडे जयंती उत्सव नियोजन समितीतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । येथील गोपीनाथराव मुंडे जयंती उत्सव नियोजन समितीतर्फे शहरात रक्तदान शिबीर, मास्क वाटप, वृक्षारोपण, अन्नदान असे विविध उपक्रम घेण्यात आले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गोपीनाथराव मुंडे यांना विविध उपक्रमाद्वारे आदरांजली वाहिली.

मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिरात बहुजन समाजाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सकाळी गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करीत गोपीनाथराव मुंडे यांचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर परिसरातील ७१ नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी मंत्री एकनाथराव खडसे, आ. सुरेश भोळे, माजी आ. गुरुमुख जगवाणी, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेद्र घुगे पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन ऍड. रोहिणीताई खडसे, जयंती उत्सव नियोजन समितीचे अध्यक्ष तथा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक विशाल त्रिपाठी, कैलास सोनवणे, चेतन सनकत, सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेविका रेश्मा काळे, नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, भाजप महागराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, रमेश लाडवंजारी, चंदन महाजन, जयराम पाटील, रमेश चाटे, दामोदर सानप, संतोष वाघ, समाधान चाटे विजय लाडवंजारी योगेश घुगे ,पिन्टु सांगळे ,कुष्णा पाटील आदी उपस्थित होते.

दिवसभरात शहराच्या विविध भागात 200 गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच मेहरूण भागात मनपाचे वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रजातींचे ३० वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दिवसभरात विविध ठिकाणी २०० नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला श्रीराम मंदिर संस्थान, मेहरूण, संस्थांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपीनाथराव मुंडे जयंती उत्सव नियोजन समितीतर्फे अध्यक्ष प्रशांत नाईक सचिन लाडवंजारी, अनिल घुगे शिक्षक मुकेश नाईक, संतोष चाटे, तेजस वाघ, ऋषिकेश वाघ, विशाल घुगे, योगेश लाडवंजारी, योगेश नाईक, गोविंद वंजारी, कृष्णा सानप, प्रतीक चाटे, ऋषिकेश चाटे, खन्ना पाटील, राहुल सानप, योगेश घुगे, कैलास चौधरी, राकेश लाडवंजारी, प्रशांत वंजारी, विक्रांत अहिरे, सागर लाडवंजारी, कैलास वंजारी, किशोर वंजारी, गजानन वंजारी योगेश नाईक आदींनी परिश्रम घेतले.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/673339736689166

Protected Content