जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थी दिवेश दिनेश भादवेलकर इयत्ता सहावीचा विद्यार्थी हा स्टार प्रवाह या चैनलच्या ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमात महाराष्ट्र मधून अंतिम बारा स्पर्धकांमधील सातव्या क्रमांकावर त्याची निवड झाली.
त्याबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, गोदावरी स्कूलच्या प्राचार्या निलिमा चौधरी तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन करुन पुढच्या कार्यक्रमाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.