नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल २७,११४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने २२,१२३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या ८,२०,९१६ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
भारतात सद्य घडीला २,८३,४०७ रुग्ण उपचार घेत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच काल दिवसभरात १९,८७३ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत ५,१५,३८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून राज्यात एकूण २,३८,४६१ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात ९,८९३ रुग्णाचा बळी गेला आहे. तसेच १ लाख ३२ हजार ६२५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. भारतात महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली आणि गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत १,१३,०७,००२ कोविड-१९ च्या चाचण्या झाल्या असून यात १० जुलैला २,८२,५११ चाचण्या घेण्यात आल्या अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.