गुवाहाटी येथून शिंदे यांचे मुंबईकडे प्रयाण ?

मुंबई- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन करावी, अशी मागणी एकनाथ शिंदे गटाने केली आहे. दरम्यान, ते गुवाहाटी येथून मुंबईकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे.

 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि भारतीय जनता पक्षासोबत एकत्रित सत्ता स्थापन करावी, अशी मागणी केली आहे.  मुंबईसाठी एकनाथ शिंदे रवाना झाल्याचे समोर येत आहे. या संदर्भाचे  वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाल्यावर राजकीय हालचालींना वेग येणार आहे. मात्र, ते मुंबईलाच येणार की दिल्लीला जाणार याबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. पण त्यांनी गुवाहाटी सोडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

Protected Content