गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेला स्थगिती

126079 deokargulabrao31

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना घरकूल गैरव्यवहार प्रकरणात झालेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

जळगावातील गाजलेल्या घरकूल गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. परिणामी ते विधानसभा निवडणूक लढवू शकले नव्हते. त्यांनी या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती रणजीत मोरे व न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढे झाली. देवकर यांच्यातर्फे ऍड.महेश देशमुख व ऍड.आबाड पोंडा यांनी बाजू मांडली देवकर यांनी नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात कोणत्याही चेकवर सही केलेली नाही, खानदेश बिल्डर्स व त्यांचा काहीही संबध नाही. तसेच त्यांनी याचे कोणतेही फायदे घेतलेले नाही. धुळे कोर्टासमोरही त्याबाबत पुरावा आलेला नाही असे मत त्यांनी खंडपीठापुढे मांडले. न्यायालयाने देवकरांच्या वकिलांचे मत ग्राह्य धरत खंडपीठात शिक्षेबाबत दाखल केलेल्या अपीलाच्या अंतीम निकाल लागत नाही, तो पर्यंत शिक्षेस स्थगिती देण्याचे आदेश दिले. तथापि, अपीलाचा निकाल लागेपर्यंत जळगाव महापालिकेची कोणतीही निवडणूक ते लढणार नाही ही अट त्यांना लावण्यात आलेली आहे.

Protected Content