गुरुवारी जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक

 

जामनेर,प्रतिनिधी ।राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची तालुकास्तरीय बैठकीचे गुरुवार १० डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे खेवलकर, तालुक्याचे नेते संजय गरुड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार १० डिसेंबर रोजी भागीरथी मंगल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत माजी कृषी मंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांचे आयोजन. पक्ष संघटन तसेच विविध समस्या व निवारण. तालुका भरात संपर्क दौऱ्याचे आयोजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तरी या बैठकीस बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील ,विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, शहर अध्यक्ष जितेश पाटील, युवक तालुका अध्यक्ष शैलेश पाटील, युवक शहर अध्यक्ष विनोद माळी यांनी केले आहे.

Protected Content