जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याच्या अर्थसंकल्पात शासनाने श्री काशीबा महाराज गुरव युवा आर्थीक विकास महामंडळाची घोषणा करून ५० कोटी रूपयांची तरतूद केल्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने गुरव समाजाच्या बांधवांनी शहरातील आर.आर. विद्यालयासमोरील संत गाडगेबाबा उद्यान येथे रविवारी १२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी नुकताच अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्यांबाबत निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व घटकासाठी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने सोलापूर येथे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात महाअधिवेशनात घेण्यात आले होते. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती होती. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री काशीबा महाराज गुरव युवा आर्थीक विकास महामंडळाची घोषणा करून ५० कोटी रूपये देण्याचे जाहीर करण्यात आले होते. या अनुषंगाने राज्यातील अर्थसंकल्पता आता मंजूरी मिळाली. याचा आनंदेात्सव साजरा करण्यासाठी शहरातील आर.आर. महाविद्यालयाजवळील संत गाडगेबाबा उद्यानात गुरव समाज बांधवांनी फटाके फोडून जल्लोष केला.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस विजय शिंदे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश गुरव, महानगर जिल्हाध्यक्ष संजय दळवी, महिला जिल्हाध्यक्ष प्रा.शैलजा बिराजदार, अनिल मोरे, मेघराज शिंदे, उमेश गुरव, अविनाश गुरव, दिपक उधळजीकर, दिपक यावलकर, प्रा.टी.एस.बिराजदार, राजू नाटकर, संगिता दळवी, वंदना शिंदे, प्रकाश नाईक, संजय शिंदे, किरण गुरव यांच्यासह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.