जळगाव राहूल शिरसाळे । आ. गिरीश महाजन, रामेश्वर नाईक आणि इतरांविरूध्द निंभोरा येथे दाखल करण्यात आलेला गुन्हा पुणे येथे दाखल करण्यासाठी लागलेला विलंब पाहता पोलिसांवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप अॅड. विजय भास्कर पाटील यांनी केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
याबाबत वृत्त असे की, नूतन मराठातील वादाच्या प्रकरणी अॅड. विजय भास्कर पाटील यांनी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, आरोग्यदूत रामेश्वर नाईक आणि इतर एकूण ३० जणांविरूध्द निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. यात डांबून ठेवत मारहाण करणे, खंडणी मागणे, धमकावणे आदी गंभीर बाबींचा समावेश आहे. हा गुन्हा निंभोरा येथे दाखल होऊन पुण्यातल्या कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग झाला आहे. काल रात्री आ. गिरीश महाजन आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अनुषंगाने अॅड. विजय भास्कर पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत आ. गिरीश महाजन यांचा नूतन मराठाच्या एक हजार कोटींच्या जमीनीवर डोळा असल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार केला. आ. महाजन यांनी उच्च न्यायालयात हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून याचिका दाखल केली असून यावर ७ जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती देखील विजय भास्कर पाटील यांनी दिली.
खालील व्हिडीओत पहा अॅड. विजय भास्कर पाटील नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/508992935887325/videos/3657938250957389