बुलढाणा अमोल सराफ | सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून सर्वच ठिकाणी संगणकाचा उपयोग होत आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याचे कौशल्य प्राप्त झाले पाहिजे या करीता प्रयत्न केला जात आहे. पण बुलढाण्यातील मेहकर येथील संताजी कॉन्व्हेंट स्कूलचा वर्ग आठवीचा अवघ्या 13 वर्षीय सर्वेश मोहरील याने आपले वयाच्या चौथ्या वर्षापासूनच डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये दाखवलेल्या कौशल्यामुळे सर्वांना आश्चर्यचकित केले आहे… एक प्रकारे तो गुगल बॉय म्हटला जाऊ शकतो..
म्हणता न बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असाच काहीसं बुलढाण्यातील सर्वेश याबाबत म्हणावे लागेल कारण की ज्या वयात आपण खेळांमध्ये आपल्या दुनियेमध्ये मदमस्त असतो त्याच वयात त्याने संगणकाची कास धरत आपले चिमुकले बोटे त्यावर फिरवत जणू सर्वांना भुरळ घातली आणि आज बघता-बघता अवघ्या तेरा वर्षात असताना त्याने आपल्या राहत्या मेहकर तालुका करिता आणि तेही सध्या सर्वांना आवश्यक असलेल्या स्वच्छतेच्या बाबींकडे लक्ष वेधत चक्क एक डिजिटल ॲप बनवून व त्यात ही स्थानिक पातळीवर तंत्रज्ञानावर आयोजित नाविन्यपूर्ण स्पर्धेत प्रथम क्रमांकाच पारितोषिक चां मानकरी ठरत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे..
याबाबत त्यांच्या आई-वडिलांना आम्ही विचारलं असता त्यांनी देखील त्याला लहानपणापासूनच संगणक आणि डिजिटल तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा होती नवीन काही असं डिजिटल वस्तू करिता तो नेहमी आग्रही असाचा आणि हेच आम्हाला कळताच आम्ही त्याच्या मागे उभे राहत त्याला डिजिटल तंत्रज्ञाना करिता सर्वतोपरी प्रोत्साहन देत असल्याचं सांगितलं
एकीकडे विशेषता मागील दोन वर्षात ज्या तंत्रज्ञानाकडे एक गरज म्हणून आपण पाहत होतो ती आता आपल्याला को रोना मुळे एक दैनंदिन साधन म्हणून पुढे आलेले आहे. अनेक नामांकीत कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ची कास धरली आहे आणि त्यात त्यांना यश देखील आलेले आहे कारण की आपली अर्थव्यवस्था ठप्प न राहण्याकरिता या तंत्रज्ञानाने कोरोना काळात आपल्याला मदतीचा हात देखील दिला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही जेव्हा सर्व ठप्प होत तेव्हा ज्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या आधारावर चालत होत्या त्यामुळे कुठेतरी अर्थशास्त्र देखील पुढे चालत होतो त्यामुळे सर्वेश नि विशेषत स्वच्छतेचे बाबत तंत्रज्ञानाच्या मदतीने पाऊल टाकले आहे ते निश्चितच स्तुत्य असाच म्हणावा लागेल.. आणि सर्वेश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातच पारंगत न होता त्यांनी अबॅकस च्या धरतीवर त्याचा उपयोग करीत तोंडी सांगितलेले गुणाकार बेरीज वजाबाकी देखील क्षणातच त्याचे उत्तर तयार करत तो सांगत हे एक त्याच्यातलं अधिकचे गणिताचं कौशल्य म्हणाव लागेल..
सर्वेशने नगर पालीकेला सॉफ्टवेअर ॲप बनवून दिले. दररोज गावामध्ये फिरणाऱ्या घंटा गाडी चे लोकेशन व त्यामध्ये कचरा टाकणाऱ्या वार्डातील व्यक्तीचे नाव नोंद होते व थेट या ॲपच्या माध्यमातून नगरपालिका संबदीत तक्रारी देखील नागरिक नोंदवू शकता..