मंबई/नागपूर वृत्तसंस्था । एकीकडे कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे बाधित रूग्णांची संख्यादेखील वाढत आहे. यात एकाच दिवसात कल्याण-डोंबिवलीतून ५१ रूग्ण तर नागपूर जिल्ह्यातून २८ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे.
राज्यासह काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशामध्ये कल्याण-डोंबिवलीकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत एकूण ३९१ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी १८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
कल्याण-डोंबिवली कोरोनाचा नवा हॉटस्पॉट
कल्याण-डोंबिवली हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. सध्या केडीएमसीत तब्बल १२१ रुग्ण हे शासकीय सेवेतील, अत्यावश्यक सेवेतील आणि खाजगी कर्मचारी आहेत. यांच्या संपर्कात आल्याने केडीएमसीत अनेकांना कोरोना झाला असल्याची माहिती आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला डोंबिवलीत झालेल्या हळदी आणि लग्न सभारंभ येथील नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरला होता. या सभारंभात अनेक जण सहभागी झाले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे रुग्णांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसं काही झालं नाही.
नागपूरात २८ जण कोरोनामुक्त
नागपुरात एकाच दिवशी २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३१८ वर पोहोचली आहे.