गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांजवळ बसायचे पण जळगावसाठी निधी आणला नाही, गुलाबराव पाटलांचा आरोप

 

 

जळगाव: प्रतिनिधी । जळगाव शहरासाठी 100 कोटी आणू, 200 कोटी आणू अशा वल्गना भाजपनेते गिरीश महाजन करायचे . तेव्हा तर गिरीश महाजन  मुख्यमंत्र्यांजवळ बसत होते. ते निधी आणू शकत होते. पण त्यांनी जिल्ह्यासाठी काहीही केले नाही, असा आरोप पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी  केला.

 

जळगावच्या विकासावरुन माजी मंत्री गिरीश महाजनांवर त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

 

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत शहरासाठी 100 कोटी आणू, 200 कोटी आणू अशा वल्गना भाजप नेते गिरीश महाजन यांनी केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी शहराची वाट लावली’, असा घणाघाती आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

 

 

जिल्हा नियोजन समितीतून जळगाव महापालिकेला विविध विकासकामांसाठी 61 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. गेल्या काळात पालकमंत्री असताना भाजपचे चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांनी शहरासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून किती रुपये दिले याची आकडेवारी दाखवावी. मी एका वर्षात 61 कोटी रुपये देऊ शकतो. तर यांनी काय दिले ते जाहीर करावे.असेही ते म्हणाले

Protected Content