गिरणा नदी पात्रातुन अवैधरित्या वाळुचा उपसा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी | तालुक्यातील अंतुर्ली खु” प्र. पा. येथील गिरणा नदी पात्रातुन अवैधरित्या वाळुचा उपसा करुन वाळुचा ढिग घालुन ठेवल्याने एका व्यक्ती विरुध्द तसेच विना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर, ट्रॅक्टर वरील अज्ञात चालक तसेच विना नंबर जे. सी. बी. व जे. सी. बी. वरील अज्ञात चालक यांचे विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, अंतुर्ली खु” प्र. पा. या गावी स्मशानभूमी जवळील गिरणा नदी पात्रातुन विना नंबरचे ट्रॅक्टर व जे. सी. बी. च्या साहाय्याने सुमारे ५२ ब्रास वाळू (सुमारे ५२ हजार रुपये किंमतीची) लबाडीच्या इराद्याने चोरुन ढिग घालुन ठेवल्याचे आज १६ डिसेंबर रोजी निदर्शनास आल्याने सचिन पाटील व त्यांचे सोबत पाच विना नंबर चे ट्रॅक्टर व ट्रॅक्टर वरील अज्ञात चालक, एक विना नंबर प्लेट असलेले जे. सी. बी. व त्यावरील अज्ञात चालक यांचे विरुद्व पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करित आहे.

 

Protected Content