Home क्राईम दारूच्या नशेत वृध्दाला शिवीगाळ व घरावर दगडफेक

दारूच्या नशेत वृध्दाला शिवीगाळ व घरावर दगडफेक

0
101

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात राहणाऱ्या एका वृध्दाला दारूच्या नशेत येवून दोन जणांनी शिवीगाळ करत त्यांच्या घरावर दगड फेडून धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजात घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता दोन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बशीर यासीन खाटीक वय ६० रा. चिंचोली ता.जळगाव हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी अक्षय वंजारी आणि गणेश पाटील दोन्ही रा, चिंचोली ता.जळगाव यांनी दारूच्या नशेत येवून काहीही कारण नसतांना बशीर खाटीक यांना शिवीगाळ करत त्यांच्या घरावर दगडफेक केली त्यानंतर धमकी दिली. यानंतर बशीर खाटीक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अक्षय वंजारी आणि गणेश पाटील दोन्ही रा, चिंचोली ता.जळगाव यांच्या विरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकुंद पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound