गावठी कट्ट्यासह तरूणाला भुसावळातून अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील चितोळे वाणी मंगल कार्यालयासमोर गावठी कट्ट्यासह एकाला अटक केली आहे. त्यांच्या तब्यातील गावठी कट्टा पोलीसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळ शहरातील वाणी मंगल कार्यालय परिसरात संशयित आरोपी खूशाल उर्फ बंटी गजानन बोरसे (वय-२५) रा. खडका रोड रामदास वाडी भुसावळ हा तरूण बेकायदेशीर रित्या गावठी बनावटीचे कट्टा घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथक भुसावळ रवाना झाले. संशयित आरोपी  खूशाल उर्फ बंटी गजानन बोरसे याला शहरातील वाणी मंगल कार्यालयाजवळून अटक केली. त्याच्या ताब्यातील लोखंडी गावठी कट्टा हस्तगत केला आहे.

 

यांनी केली कारवाई

पोनि. किरण कुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जालिदर पळे, सहाय्यक फैाजदार अशोक महाजन, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, संदीप साळवे, पोना किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ. विनोद पाटील, पोकॉ ईश्वर पाटील, विजय चौधरी यांनी केली.

Protected Content