गावठी कट्टा व जीवंत काडतुसांसह आरोपी अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जामनेर रोड परिसरात गावठी कट्टा व दोन जीवंत काडतुसांसह एका आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी गजाआड केले आहे.

याबाबत वृत्त असे की, दिनांक २६ रोजी पाच वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याना मिळालेल्या गुप्त बातमी वरून भुसावळ शहरात जामनेर रोडवरील साई बाबा मंदिर जवळ एजाज उर्फ सोन्या खान अयुब खान वय-२६ (रा.जाम मोहल्ला भुसावळ) हा त्याच्या कब्जात गावठी कट्टा बाळगत असल्याचे आढळून आले. यामुळे त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कडून गावठी कट्टा व जिवंत कारतुसांसह आरोपी एजाज उर्फ सोन्या खान अयुब खान याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरूध्द बाजारपेठ पोलीस स्थानकात आर्म अ‍ॅक्ट कलम-३/२५ प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

संबंधीत कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अनिल मोरे, पो. ना. किशोर महाजन, रमण सुरळकर, रविंद्र बिर्‍हाडे, तुषार पाटील, दीपक पाटील, पोका विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव, कृष्णा देशमुख,सुनील साळूखे यांनी केली आहे.

Protected Content