गाय विज्ञान परीक्षेला प्रोत्साहनाची विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाची सूचना

 

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था ।  विद्यापीठ अनुदान आयोगानं सर्व विद्यापीठांना गाय विज्ञान परीक्षेसंदर्भात आदेश काढला आहे. २५ फेब्रुवारीला होणाऱ्या गाय विज्ञान परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं, अशा सूचना यूजीसीनं दिल्या आहेत.

 

विद्यापीठ अनुदान आयोगानं गाय विज्ञान परीक्षेचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्यास सांगितलं आहे. या परीक्षेत गाय विज्ञान संदर्भात विविध प्रश्न विचारले जातील.

 

राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना २०१९ मध्ये करण्यात आली. केंद्रीय पशूपालन आणि मत्स्य मंत्रालायाचा याद्वारे गाय विज्ञानाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. आयोगानं २५ फेब्रुवारीला प्रमाणपत्र परीक्षेचे आयोजन केले आहे. ही परीक्षा चार वेगवेगळ्या गटांमध्ये होणार आहे.

 

 

गाय विज्ञान परीक्षेचा कालावधी एक तास असेल. ही परीक्षा बहूपर्यायी स्वरुपाची असेल. परीक्षेचे एकूण गुण ७५ असतील. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसेल. परीक्षेचे आयोजन इंग्रजी, हिंदी, गुजराती, संस्कृत, पंजाबी, मराठी, मल्याळम, तामीळ, तेलुगू, उडिया भाषेत केले जाणार आहे. प्रत्येक विभागासाठी वेगवगेळ्या वेळी परीक्षा होणार आहे. सहभागी होणारे विद्यार्थी लॅपटॉप आणि मोबाईलवरुन परीक्षा देऊ शकतात.

 

परीक्षा संपल्यानंतर लगेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी सर्व विद्यापीठांना परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यास सांगितलं आहे.

 

गाय विज्ञान परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशीगाय आणि त्यासंदर्भातील मुद्दे, अर्थव्यवस्था, पर्यावरण, आरोग्य याविषयी जागरुक केले जाणार आहे. विद्यार्थी भारतातील विविध भाषांमध्ये परीक्षा देऊ शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगानं यासंदर्भातील उदासीनता पाहून विद्यापीठांना नोटीस पाठवलं आहे.

Protected Content