Home क्राईम गायी चोरीच्या संशयावरून दोघांना चोपले

गायी चोरीच्या संशयावरून दोघांना चोपले


जळगाव प्रतिनिधी |शहरातील दुध फेडरेशनजवळील राजमालती नगरातील एकाच्या मालकीच्या दोन गायी चोरीला गेल्या होत्या. दरम्यान बुधवारी दोन तरुण या गायी सुरत रेल्वेगेटजवळून चारण्यासाठी नेत असतांना चोरीच्या संशयावरून काही तरुणांनी सुरत रेल्वेगेटजवळ दोघांना बेदम मारहाण केली. याप्रकरणामुळे परिसरात तणाव झाला होता. शहर पोलीसांनी याठिकाणी धाव घेवून दोघांना पोलीस स्टेशनला आणले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास शहर पोलीस स्टेशनला दोन्ही गटाच्या तरुणांची गर्दी झाली होती.

सविस्तर माहिती अशी की, शहर पोलीसांनी ही घटना तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असल्याचे सांगून जमावाला पांगवून लावले. त्यानंतर दोन्ही तरुणांना घेवून जमाव तालुका पोलीस स्टेशनला आल्यानंतर तालुका पोलीसांनी ही हद्द शहर पोलीसांचीच असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा हा जमाव शहर पोलीस स्टेशनला आला. जमाव शहर पोलीस स्टेशनला आल्यानंतर याठिकाणी आपसात समझोता झाल्यानंतर वाद मिटला. गायी चोरीबाबत कोणीही तक्रार न दिल्याने याबाबत पोलीस स्टेशनला कुठलीही नोंद नव्हती. पोलीसांनी देखील हद्दीचा वाद पुढे करीत कारवाई करण्याच टाळले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound