जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील गाडेगाव येथील शिवारात असणार्या विहिरीत आज एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे.
दिनांक आठ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गाडेगाव शिवारातील एका शेतातील विहिरीत हिंगणे गावाकडे जाणार्या रोडावर ५०० मिटर अंतर मध्ये असलेल्या शेतातील विहिरी मध्ये ३० वर्षे वयोगटातील अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
ही माहिती मिळताच पाचोरा विभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार पाटील, अतुल पवार, जगदीश सूर्यवंशी यांनी घटनास्थळी पाहणी केली. सदर मयत इसमाच्या अंगात निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व हिरव्या रंगाचा ची टी-शर्ट आहे.
या घटनेबाबत गाडेगावचे पोलीस पाटील भिमसिंग परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर इसम कोणाचे नातेवाईक किंवा ओळखीच्या मित्र घरून परिसरातून गेलेला असेल व त्याबाबत मिसिंग दाखल करण्यात आली असेल तर त्यांनी जामनेर पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल तुषार पाटील मोबाईल नंबर ९१ ५८ ११ ९१ १०, मोबाईल नंबर ९४ २३ ४८ ८८ ६३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.