नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी आज सायंकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत लोकसभा जागा वाटपाची चर्चा केल्याचे वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आलेले आहे. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी २० अशा एकूण ४० जागांच्या वाटपावर शिक्कामोर्तब केले आहे. तर उर्वरित जागांच्या वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी आज सायंकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खर्गे होते. तर या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही उपस्थिती होती.