गलवान संघर्षात चीनने ४५ सैनिक गमावले

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  जून २०२०मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात चीनचे ४५ सैनिक ठार झाले, तर भारताचे २० जवान शहीद झाले असे रशियन वृत्तसंस्था तासने   म्हटले आहे. पूर्व लडाखमधून भारत आणि चीन दोघांनी सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु केली आहे.

 

काल चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सर्वप्रथम सैन्य माघारी सुरु झाल्याचे जाहीर केले होते. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत या संबंधी माहिती दिली. गलवान खोऱ्यातील संघर्षात आपले किती सैनिक ठार झाले, ते चीनने अद्यापही जाहीर केलेले नाही.

 

अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्यानेही काही माध्यमांनी गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचे म्हटले होते. गलवानमधील या घटनेच्या सात ते आठ महिन्यानंतर आता दोन्ही देश तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत.

 

 

 

आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, आज संसदेत सांगितले. लडाखमध्ये चीन बरोबर सुरु असलेल्या सीमावादाच्या विषयावर ते बोलत होते. पँगाँग टीसओ सरोवराच्या भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली.

टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

Protected Content