शेंदूर्णी : प्रतिनीधी । शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे रघुनाथराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज ब्रोकर्स फोरम, (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने “कोरोना काळात भारताची आणि जगाची आर्थिक परिस्थिति आणि गुंतवणूक निर्णय” या विषयावरील पाच दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली
देशातील 850 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरम यांच्या “गुंतवणूकदार शिक्षण आणि जागृती” या उपक्रमांतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
गूगल मीट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दि. 21 ते 25 सप्टेंबर या काळात आभासी परिषदेच्या माध्यमातून या कार्यशाळेकरिता या महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांसह देशातील ८५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यानी सक्रिय सहभाग नोंदविला
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरमचे अमित साळसकर यांनी भाग बाजार, प्रतिभूती बाजार, कोरोना काळातील देशासह जगाची आर्थिक स्थिती यावर मार्गदर्शन केले . बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरमच्या शिक्षण विभागाच्या प्रमुख . शेहनाझ शेख, . सिद्दिकी, मुजब्बिर शेख, यांनी त्यांना सहकार्य केले
अमित साळस्कर यांनी भागबाजाराची ओळख, कार्यप्रणाली, भागबाजारातील घटक, प्राथमिक भागबाजार, दुय्यम भागबाजार, भागांचे प्रकार, प्रतिभूतीबाजार, प्रतिभूतींचे प्रकार, प्रतिभूतींचे नियमन आणि नियंत्रण, भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ (सेबी), भारतीय रिजर्व बँक अशा नियामक संस्थांची ओळख, भाग (शेअर) खरेदी-विक्री व्यवहारांची ओळख, तेजी-मंदीचे व्यवहार, सेंसेक्स, निफ्टि फिफ्टी, नोंदनिकृत कंपन्या, शेअर खरेदी-विक्री करताना घ्यावयाची काळजी , आवश्यक मूलभूत विश्लेषण, खरेदी-विक्रीचा निर्णय, मुच्युअल फंड, डेरीव्हेटीव्हज, पैसाबाजार, भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर, युरो डॉलरचे विनियंमन, भांडवल बाजार, नाणेबाजार, भारतीय रिजर्व बँकेचे मुद्रा विषयक धोरण इ. विषयी मार्गदर्शन केले .
चेअरमन संजय गरुड, कार्याध्यक्ष सतीशराव काशीद, सचिव सागरमल जैन, सहसचिव दिपक गरुड, संचालक उज्वला काशीद, . यू. यू. पाटील, सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ. वासूदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे यांच्या प्रयत्नाने आणि डॉ. सुजाता पाटील, डॉ. योगिता चौधरी, डॉ. रोहिदास गवारे आणि डॉ. वसंत पतंगे यांच्या सहकार्याने उपप्रचार्य प्रा. आर. जी. पाटील, डॉ. संजय भोळे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा यशस्वी करण्यास मदत झाली.