गरुड महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षा सुरळीत

 

शेंदूर्णी, प्रतिनिधी । विद्यापीठ अनुदान आयोगाचा सूचनांनुसार कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत १२ ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धती सुरू झाल्या आहेत. येथील अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथे अंतिम वर्षाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा सुरळीत पार पडल्या.

शेंदुर्णी केंद्रावरील परीक्षेची पाहणी करण्यासाठी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनी भेट दिली व चाललेल्या कामाबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले. संस्थेचे सचिव सतीश काशीद यांनी सुद्धा सायंकाळच्या सत्रात परीक्षांचा आढावा घेतला. पहिल्याच दिवशी आलेल्या सर्व अडचणी प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील, अंतर्गत वरिष्ठ पर्यवेक्षक प्रा संजय भोळे , उपप्राचार्य प्रा. डॉ. श्याम साळुंखे, ऑनलाइन कॉर्डिनेटर, प्रा.डॉ. आजिनाथ जीवरग, प्रा.डॉ. योगिता चौधरी, प्रा. निलेश बारी. कार्यालय अधीक्षक सतीश बाविस्कर, वरिष्ठ लिपिक हितेंद्र गरुड सर्व पर्यवेक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी योग्य पद्धतीने सोडविल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन परीक्षांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

Protected Content