नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गरीबांना ३० नोव्हेंबरपर्यंत धान्य मोफत दिले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. याचा लाभ देशातल्या ८० कोटी जनतेला होणार आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मोदी म्हणाले की, प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्यात आला असून नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरु राहणार असल्याची घोषणा मोदींनी. देशातील 80 टक्के नागरिकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ आणइ एक किलो दाळ आणखी 5 महिने मोफत मिळणार आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाविरुद्ध चांगली लढाई लढली आहे. मात्र, अद्यापही संकट टळले नसून जास्तीची खबरदारी घेण्याची गरज आहे. एवढंच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार आहे अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. जे करदाते आहेत त्यांना मी अभिवादन करतो त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचा कर भरला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असेही मोदींनी म्हटले. अनलॉक १ सुरू झाल्यापासून देशात जरा बेजबाबदारपणा वाढला असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. हा निष्काळजीपणा हा चिंतेचा विषय असल्याचेही मोदी म्हणाले. प्रतिबंधित क्षेत्रावर विशेष लक्ष द्यावेच लागेल असेही मोदी पुढे म्हणाले. दरम्यान, लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण यामुळे सध्या देश चिंतीत आहे. भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावाबाबत मोदी बोलतील, असा देशवासियांना अंदाज होता. मात्र, मोदींनी आपल्या भाषणात कोरोनाच्या संकटावर भाष्य केले.