नीरज चोप्राची पुन्हा भरारी : जिंकली प्रतिष्ठेची स्पर्धा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ऑलिंपीकमध्ये सुवर्णपदक संपादन करणार्‍या नीरज चोप्रा याने पुन्हा नव्या शिखराला गवसणी घातली आहे.

 

दिग्गज भालाफेकपटू नीरज चोप्राने देशाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. नीरजने लॉसने डायमंड लीग या स्पर्धेमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. ८७.६६ मीटर अंतरावर भाला फेक करत त्याने सुवर्णपदक जिंकले आहे. सिझनमधला हा त्याचा दुसरा विजय आहे. याआधी दोहा डायमंड लीगमध्ये ८८.६७ मीटर भालाफेक करत नीरजने पहिलं स्थान मिळवलं होतं. या पाठोपाठ त्याने दुसरे विजेतेपद जिंकले आहे.

 

नीरज चोप्राने ५ मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर आता लॉसने डायमंड लीगमध्ये त्याने पहिलं स्थान पटकावलं आहे. यामुळे त्याची दमदार कामगिरी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

Protected Content