पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील एक २१ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार करून तीन महिन्याची गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, पारोळा तालुक्यातील एका भागात राहणारी २१ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई व भाऊसह वास्तव्याला आहे. ती गतिमंद असल्यामुळे ती घरीच असते. दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून तिच्यावर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. तिच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी ती महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती सांगितली. अल्पवयीन मुलगी ही अविवाहित असून तिचा गतिमंदचा फायदा घेऊन आज्ञात व्यक्तीने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना घडल्यानंतर तिच्या आईने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.