भारत जोडो यात्रेत हार्ट अटॅक : कॉंग्रेस खासदाराचा मृत्यू

फगवाडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या कॉंग्रेस खासदाराचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे.

पंजाबमध्ये सुरू असलेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जालंधरचे कॉंग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी यांचे निधन झाले. ते राहुल गांधी यांच्यासमवेत यात्रेत चालत होते.दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तात्काळ फगवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. संतोख सिंह चौधरी (वय ७६) हे जालंधरचे विद्यमान खासदार होते. २०१९ मध्ये ते दुसर्‍यांदा खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले. याआधी त्यांनी २०१४ मध्ये विजय मिळवला होता.

दरम्यान, या घटनेनंतर कॉंग्रेस पदाधिकार्‍यांनी भारत जोडो यात्रा काही काळासाठी थांबवली आहे. ही यात्रा आज लुधियानाच्या लाडोवाल टोल प्लाझा येथून फगवाड्याच्या दिशेने निघाली होती. त्यादरम्यान ही घटना सकाळी घडली. सकाळी ८.४५ च्या सुमारास खासदार संतोखसिंह यांची प्रकृती खालावली. त्यानंतर राहुल गांधीही त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. तर त्यांच्या निधनानंतर भारत जोडो यात्रा काही काळ थांबविण्यात आलेली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: