धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री जिनिंग येथे आज गणेश चातुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे. याप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महूर्ताचा भाव ११ हजार १५३ रूपये प्रति क्विंटला भाव देण्याचा आला आहे. दरवर्षी प्रमाणे धरणगाव तालुक्यातील जीनिंग उद्योगात गणेश चतुर्थीच्या मुहार्तवर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी खरेदीचा शुभारंभ काटापूजन करून करण्यात आला. श्री. जिनिंगमध्ये काटा पूजन नयन शेठ गुजराथी, जीवनसिंह वयस, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, सागर कर्ता, प्रवेश गुजराथी, निखिल ययस, नीलेश चौधरी या संचालकाच्या हस्ते करण्यात आले. मुहूर्तावर पहिल्याच दिवशी साधारण क्विंटल कापूसची आवक साधारण २ हजार क्विंटल श्री जिनिंगमध्ये होती. स्थानिकपेक्षा आंध्रप्रदेशमधील आवक सर्वाधिक होती. कार्यक्रमाला राकेश चौधरी, गजानन साठे, किरण अग्निहोत्री, मनोज बोरसे यांच्यासह परिसरातील जिनिंग उद्योजक, अंजनी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील या कार्यक्रमास हजेरी लावली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन साठे, चेतन गुजराथी यांच्यासह श्री जिनिंगचे व्यवस्थापनाने परिश्रम घेतले.