खोटे नगर येथे २६/११च्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

जळगाव, प्रतिनिधी | साई मोरया ग्रुप खोटे नगर व जळगाव तालुका पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने खोटे नगर स्टॉपवर २६/११ च्या हल्यात शहीद झालेल्या विरपुत्रांना श्रद्धांजलीचा “कुछ याद उन्हे भी करलो” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

२६/११ च्या हल्ल्याची सविस्तर माहिती ऋषिकेश बडगुजर यांनी दिली. कार्यक्रमास जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस उपनिरीक्षक श्री. कासार, नयन पाटिल, काॅंस्टेबल मनोज लोखंडे, मनोज पाटील, मराठे यांचेसह साई मोरया ग्रुपचे अध्यक्ष उमाकांत जाधव तथा पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. शहीद झालेल्या विरपुत्रांच्या प्रतिमेचे पूजन करून व मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन शांती मंत्राचे पठण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हितेश पाटील, मंथन ईशी, प्रसन्न जाधव, हेमंत महाजन, दिप पाटील, पराग पाटील, निखिल पाटील, मोहित पाटील, सुदर्शन ईशी, सूर्यकांत भामरे, कल्पेश पाटील, विवेक करपे, सौरभ कदम, निखिल जाधव, हर्षल महाजन, हीतेश पाटील यांनी कामकाज पहिले.

Protected Content