नागरिकांनी सामोपचाराने आपले वाद लोकन्यायालयाच्या माध्यमातून मिटवावे : न्या.डी. एम. चामले

पहूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सध्या सुद्धा किरकोळ कारणांमुळे कधीकधी  आपल्या ईगोमुळे  विनाकारण वाद निर्माण होतात. कित्येक वर्षे कोर्टात दावे फाटे,प्रकरणे प्रलंबित असतात. पैसा, वेळ जातो, हितसंबंध, नातेसंबंध यामुळे खराब होतात. यासाठी आपसातील विवाद लोकन्यायालयाच्या माध्यमातून सामोपचाराने  मिटवावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जामनेर येथील दिवाणी न्यायाधीश  डी. एन. चामले यांनी केले.

 

पहुर येथे जामनेर तालुका विधी सेवा समिती, जामनेर वकील संघ व पहुर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहुर पोलीस स्टेशनला कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून न्या. चामले यांनी कायदेविषयक माहिती, आरोपी, फिर्यादी तसेच पोलिसांच्या अधिकार, कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. पहुर पोलीस स्टेशनमध्ये सुंदर आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन सहदिवाणी न्यायाधीश बी. एम. काळे,  सरकारी वकील  अॅड. कृतिका भट ,जामनेर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. किशोर राजपुत, पहुरचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे,  दिपमाला इंगळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अॅड. संजय पाटील यांनी केले

यावेळी सह.दिवाणी न्यायाधीश  बी.एम.काळे यांनी नागरिक, पोलीस यांचे हक्क, कर्तव्य, कायदे याबाबत तसेच विविध विषयांवर कायदेशीरबाबींची माहिती दिली. अॅड. प्रदिप शुक्ल यांनी मोटार अपघाताच्या संदर्भात कायद्याबाबत मार्गदर्शन केले.

पहुरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी हा कार्यक्रम आपल्या पोलिस स्टेशनला घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलिसांना काम करत असतांना येणाऱ्या अडचणी,कायदेशीर बाबतीत सदैव मार्गदर्शन होत असल्याचे.सांगितले.

याप्रसंगी  अॅड. ज्ञानेश्वर  बी.बोरसे, अॅड. देवेंद्र पारळकर, अॅड. कमलाकर बारी, अॅड.डिगंबर गोतमारे, अॅड. सचिन पाटील ,अॅड. सोनाली सुरवाडे,अॅड. शिल्पा साळवे तसेच पोउनि. संजय बनसोड, दिलीप पाटील, अमोल गर्जे तसेच पंचक्रोशीतील पोलीस पाटील,शहरातील मान्यवर आदी उपस्थित होते.  याप्रसंगी  पोउनि. दिलीप पाटील यांनी आभार मानले.

 

Protected Content