खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी पाटबंधारे विभागासमोर उपोषण (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । पैशांची मागणी करून खोटी तक्रार देणाऱ्या १४ सुरक्षा रक्षकांना सेवेतून मुक्त करावे आणि माहिती अधिकारात माहिती न देणाऱ्या उपकार्यकारी अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी आज पाटबंधारे मध्यम प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर तक्रारदार प्रमोद इंगळे यांनी आमरण उपोषण केले.

प्रमोद इंगळे यांनी दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, २० जानेवारी रोजीपासून माध्यम प्रकल्प मंडळात १४ सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. या १४ सुरक्षा रक्षकांकडून प्रमोद इंगळे यांनी पैशांची मागणी करतो अशी खोटी तक्रार १४ सुरक्षा रक्षकांनी पाटबंधारे वाघुर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली होती.

इंगळे यांना तक्रारीबाबत माहिती मिळाल्यानंतर, आपल्याविरूध्द तक्रार दिली असल्यामुळे संबंधित १४ सुरक्षा रक्षकांवर गुन्हे दाखल व्हावे यासाठी माहिती आधिकाराचा वापर करून सुरक्षा रक्षक कार्यरत असलेल्या जागेचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे यासाठी उपकार्यकारी अभियंता तथा जन माहिती अधिकारी सी.के.पाटील यांच्याकडे २३ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता. मात्र अद्यापपर्यंत माहिती जाणीवपुर्वक देण्यात आलेली नाही. कारण १४ सुरक्षा रक्षक यांच्यात सी.के.पाटील यांचे नातेवाईक असतील किंवा १४ सुरक्षा रक्षक कडून आर्थिक देवाणघेवाण केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंता यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासावे १४ सुरक्षा रक्षकांनी केलेल्या तक्रारीत दोष असल्यास आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा १४ सुरक्षा रक्षकांना सेवामुक्त करण्यात यावे आणि जन माहिती अधिकारी तथा उप कार्यकारी अभियंता सी.के. पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषण कर्ते प्रमोद इंगळे यांनी केले आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/3907831369263243

 

Protected Content