जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खोटे नगर ते आकाशवाणी चौक पर्यंतच्या महामार्गावरील उड्डाणपुलास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल भारतीय युवक महासंघ आणि छावा संघटनेच्या वतीने गुरूवारी १ जून रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील आकाशवाणी चौक ते खोटे नगर महामार्गावरील उड्डाण पुलास श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, या मागणीला जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देखील साकारात्मक दुजोरा दिलेला आहे. परंतू अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. नुकतेच छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यामुळे शहरातील आकाशवाणी चौक ते खोटे नगर पर्यतच्या महामार्गावरील उड्डाणपुलास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासबाबत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करून प्रस्तावला लवकरात लवकर मंजूरी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संघटक देवेंद्र मराठे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष केतन पाटील, अखिल भारतीय युवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय पाटील, किरणपाटील, अक्षय शिंदे, कृष्ण पाटील, प्रतिक लोखंडे, अशोक पाटील, भगवान शिंदे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.