जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रीडा संकुलाची नोंदणी फी व शुल्क जास्त आकारले जात असल्याबद्दल तक्रार देत रास्त दरात क्रीडा संकुल खेळाडूंना उपलब्ध करून देण्याचे जिल्हा क्रीडा संघटनेने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देवून शासनाकडे मागणी केली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव क्रीडा संकुलाची नोंदणी फी ही वर्षासाठी ३५० रुपये होती व शंभर रुपये मॉर्निंग वॉक व वैयक्तिक क्रीडा प्रकाराच्या सराव करणाऱ्यांसाठी होती. १ नोव्हेंबर पासून ३१ मार्च २२ पर्यंत पाच महिन्याची नोंदणी फी २०० रुपये व वयक्तिक सराव शुल्क १०० रुपयाचे ऐवजी २०० रुपये क्रीडासंकुल समितीने चुकीच्या पद्धतीने आकारले ते त्वरित रद्द करावे व नोंदणी फी पाच महिन्याची दीडशे रुपये व मॉर्निंग वाक व वैयक्तिक सरावाचे शंभर रुपये दरमहा ठेवण्यात यावी
निवेदन देतांना शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आयशा खान, विविध क्रीडा संघटनांचे प्रमुख फारुक शेख, आंतरराष्ट्रीय खेळाडू विवेक आळवणी, राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक किशोर सिंग, राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू व प्रशिक्षक रवींद्र धर्माधिकारी, राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षक शेखर देशमुख, यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनावर तायक्वांदोचे अजित घार्गे, जलतरणच्या अध्यक्षा रेवती नगरकर, प्रशिक्षक अब्दुल मोहसीन, लियाकत अली, संजय पाटील, श्वेता कोळी, वाल्मिक पाटील, समीर शेख, कासार फझल, मुझफ्फर खान यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.