जळगाव प्रतिनिधी । शहरातील खेडी रोड परिसरातील गिताई नगरात राहणार्या वकील महिलेचा घरातून मध्यरात्रीच्या सुमारास आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केल्याची घटना 6 ऑक्टोंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील खेडी रोड परिसरातील गिताई नगरात अॅड. दिपाली जयंत काटे (साहू) या वास्तव्यास आहेत. 5 ऑक्टोंबर रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास त्यांनी आपला मोबाईल खिडकी जवळ चार्जिंगसाठी लावला. आणि यानंतर त्या झोपून गेल्या. दुसर्या दिवशी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उठल्यावर त्यांना त्याचा मोबाईल खिडकीमध्ये दिसून आला नाही. त्यांनी कुटुंबियांकडे मोबाईलबाबत विचारपुस केली असता कोणालाही काही माहित नव्हते. आपला मोबाईल चोरीस गेल्याची खात्री झाल्यावर शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन आठ हजार रुपयांचा मोबाईन लंपास केल्याप्रकरणी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमोल विसपुते करीत आहेत.