खून खटल्यातील फिर्यादी व आरोपी यांच्यात न्यायालयाच्या आवारात हाणामारी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवाजी नगरातील तरुणाच्या खून खटल्याचे कामकाज सुरू असताना असताना बुधवारी 12 जून रोजी दुपारी 3 वाजता फिर्यादी व आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाल्याने हाणामारी झाल्याची घटना जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात घडली आहेत.

शिवाजी नगरातील स्मशानभूमी जवळ राकेश अशोक सपकाळे याचा ४ नोव्हेंबर २०२० रोजी खून झाला होता. हा खटला सुरू असून यामध्ये बुधवार, १२ जून रोजी दुपारी तीन वाजता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सलमान युनूस शेख यांची साक्ष नोंदविली जात होती. या कामकाजादरम्यान फिर्यादी व आरोपी गटाचे समर्थक न्यायालय परिसरात आले होते. दोन्ही गटात शाब्दीक वाद सुरू झाला. त्यानंतर बाहेर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान या संदर्भात अद्याप पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content